Punjab Shocker: पंजाब पोलिस उपनिरिक्षकाचा सापडला मृतदेह, पूर्ववैमन्स्यातून हत्या केल्याचा संशय,चौकशी सुरु
अमृतसरमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Punjab Shocker: अमृतसरमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंजाबचे पोलिस उपनिरिक्षक शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी अमृतसतरमध्ये मृतावस्थेत सापडले. सरूप सिंग असं मृत झालेल्या पोलिस उपनिरिक्षकाचे नाव होते. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह नाल्याजवळ आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टर्माटमसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती डीसीपी सुचा सिंग यांनी दिली. या हत्येला कोणताही राजकिय कोन नसून पूर्ववैमन्सातून झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)