Amul Milk Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा झटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, आता 3 रुपयांनी महाग मिळणार अमूल फुल क्रीम दुध

दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. नवीन किमती तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

Amul Milk Price Hike: गुजरात डेअरी सहकारी अमूलने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. नवीन किमती तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. निवेदनानुसार, या सुधारणेनंतर, अमूल गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेश 54 रुपये प्रति लीटर, अमूल गायीचे दूध 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल म्हशीचे दूध 70 रुपये प्रति लीटर असेल.अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी दरवाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement