Daksh Chaudhary Viral Video: अयोध्यात भाजप पक्षाचा पराभव झाल्यानंतर मतदारांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाला अटक

अयोध्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर मतदारांना शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंन्टेट क्रीएटर दक्ष चौधरी आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आले आहे.

Daksh Chaudhary Viral Video PC TWITTER

Daksh Chaudhary Viral Video:  अयोध्यात भारतीय जनता पक्षाचा  (BJP) पराभव झाल्यानंतर मतदारांना शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंन्टेट क्रीएटर दक्ष चौधरी आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आले आहे. व्हिडिओत भाजपला मतदान न केल्याने मतदारांना शिविगाळ करत आहे. या प्रकरणी दोघांवर 295 ए  आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी दिल्लीत निवडणूक प्रचारादरम्यान कॉंग्रेस नेता कन्हैया कुमारला थप्पड मारल्याप्रकरणी दक्ष चौधरीला ताब्यात घेतले होते. (हेही वाचा- नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने मारली थप्पड)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now