Assam Shocker: 42 वर्षीय महिलेची हत्या करून आरोपीने पीडितेच्या मृतदेहावर केला बलात्कार, नराधमाला अटक
आरोपीने शुक्रवारी उदलगुरी सदर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि नंतर बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने शनिवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Assam Shocker: आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी एका 42 वर्षीय महिलेची हत्या करून नंतर तिच्या मृतदेहाबरोबर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. 6 सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपीने शुक्रवारी उदलगुरी सदर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि नंतर बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने शनिवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ही महिला 25 ऑगस्ट रोजी जवळच्या नाल्यात आंघोळीसाठी गेली असताना ही घटना घडली.
एका गावकऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, या क्रूर घटनेमागे गावातीलच कोणीतरी असू शकते. यावर महिलेच्या पतीला सुरुवातीला खात्रीच नव्हती. गावकऱ्याने सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की, महिला आंघोळ करत असताना आरोपीने मागून जाऊन तिची हत्या केली. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पण सुरुवातीला, चित्र धुसर होते आणि म्हणूनच तिचा पती गंभीर कायदेशीर लढाईसाठी तयार नव्हता. कारण गावकरी आरोपीला ओळखू शकले नाहीत.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर लगेचच गावातील एका लॉबीने अलौकिक शक्तीच्या प्रभावाखाली तिचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवून या घटनेला रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांच्या चौकशीच्या मागणीनंतर आणि पोलिसांच्या तपासासाठी तिचा मृतदेह दफनभूमीतून बाहेर काढण्यात आला.
उदलगुरी एसपी सुप्रिया दास यांनी सांगितले, “पीडितेचा मृतदेह मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 376/302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही शक्य तितक्या लवकर हे प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि खटला चालवू.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)