Adani Group आता रेल्वे तिकीट ऑनलाइन विकणार, ट्रेनमॅनमध्ये 30% हिस्सा खरेदी करणार, IRCTCला देणार टक्कर?
शनिवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये, अदानी एंटरप्रायझेसने सांगितले की अदानी डिजिटल लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडने एसईपीएलमधील 29.81 टक्के हिस्सा 3.56 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.
अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने (Adani Enterprises) ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म ट्रेनमॅनमध्ये सुमारे 30 टक्के हिस्सा 3.5 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. म्हणजे आता अदानी ग्रुप रेल्वे तिकीटांची ऑनलाइन विक्रीही करणार आहे. अदानी एंटरप्रायझेसने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की त्यांनी SEPL मध्ये 100 टक्के हिस्सेदारी घेण्यासाठी करार केला आहे. शनिवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये, अदानी एंटरप्रायझेसने सांगितले की अदानी डिजिटल लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडने एसईपीएलमधील 29.81 टक्के हिस्सा 3.56 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. यावर आयआरसीटीसीने सांगितले होते की, रेल्वेमध्ये दररोज सुमारे 14.5 लाख आरक्षित तिकिटे बुक केली जातात. यापैकी, सुमारे 81% ई-तिकिटे फक्त IRCTC द्वारे बुक केली जातात. त्यामुळे IRCTC आणि ट्रेनमॅनसह त्याचे एजंट यांच्यात स्पर्धा नाही.