Uttar Pradesh Shocker: सुरक्षा रक्षकाकडून अपघाती गोळीबार, घटनेत स्वत: झाले जखमी, Video Viral

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील कॅनरा बॅंकेच्या शाखेत सुरक्षा रक्षकाच्या हातातून हातातून अपघाती गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे

Uttar Pradesh PC TWITTER

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील कॅनरा बॅंकेच्या शाखेत सुरक्षा रक्षकाच्या हातातून हातातून अपघाती गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, बॅंकेच्या सुरक्षा रक्षकाने चूकून बंदूकीने गोळी झाडली. या घटनेत त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. घटनेनंतर पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते. (हेही वाचा- दिल्लीच्या मुखर्जी नगर भागात भरदिवसा तरुणीवर चाकू हल्ला, आरोपी अटकेत)

ही घटना शुक्रवारी (२२ मार्च) दुपारी पालिया महामार्गालगत असलेल्या कछौना शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेत घडली. कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक सुनील मिश्रा याने त्याच्या DBBL (डबल बॅरल ब्रीच लोडिंग) बंदुकीची चुकीची हाताळणी केली. याचा परिणाम म्हणजे अपघाती गोळीबार त्याच्या डाव्या पायाला लागला. या अपघातामुळे बँकेच्या आत असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली.

बॅंकेच्या शाखेत उपस्थित असलेले लोकांनी जखमी गार्डला मदतीला धावले. सुदैवाने बॅंकेच्या आत उपस्थित असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला गोळी लागली नाही.सुरक्षा रक्षकाला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)