BSF Jawan Missing: पुंछमध्ये एलओसीजवळ बीएसएफ जवान बेपत्ता, शोध मोहीम सुरु

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील सीमा सुरक्षा दलाचा एक जवान बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

BSF Jawan Missing: पुंछमध्ये एलओसीजवळ बीएसएफ जवान बेपत्ता, शोध मोहीम सुरु
| (Photo Credits: Twitter/ANI)

BSF Jawan Missing:  जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील सीमा सुरक्षा दलाचा एक जवान बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. पीटीआयच्या वृत्तानुसार, बिहारचा राहणारा, बालाकोट सेक्टरमधील फॉरवर्ड पोस्टवर हा जवान शुक्रवारी बेपत्ता झाला. बीएसएफच्या जवानांनी शोध मोहीम हाती घेतली होती, ज्याचा शोध अद्यापही  लागला नाही, त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.  दोन महिन्यांपुर्वी एक जवान देखील बेपत्ता झाला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2023 12:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).