AAP MLA Abused Farmers: आप आमदार रणबीर सिंह यांचे शेतकऱ्यांशी भांडण; शिवीगाळ करताना दिसले नेते, व्हिडिओ व्हायरल
रणबीर सिंग यांनी एका सार्वजनिक रॅलीत भाग घेतला होता, जेथे ते त्यांचे काही समर्थक आणि शेतकऱ्यांसह फिरताना दिसले. हिरवे झेंडे घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढत नेत्याला घेराव घातला. यावेळी किसान मोर्चातील एका ज्येष्ठ सदस्यासोबत रणवीर सिंग यांचा वाद सुरु झाला.
AAP MLA Abused Farmers: आम आदमी पक्ष (AAP) नव्या वादात सापडला आहे. आपचे फिरोजपूरचे आमदार रणबीर सिंग हे शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. व्हिडिओमध्ये रणबीर सिंग शेतकऱ्यांशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. रणबीर सिंग यांनी एका सार्वजनिक रॅलीत भाग घेतला होता, जेथे ते त्यांचे काही समर्थक आणि शेतकऱ्यांसह फिरताना दिसले. हिरवे झेंडे घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढत नेत्याला घेराव घातला. यावेळी किसान मोर्चातील एका ज्येष्ठ सदस्यासोबत रणवीर सिंग यांचा वाद सुरु झाला. पुढे सिंग यांचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारकडून अधिक एमएसपीच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाने नुकत्याच झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांना धार्मिक पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत आमदार रणबीर सिंह यांचा हा व्हिडिओ पक्षासाठी नवे आव्हान निर्माण करू शकतो. (हेही वाचा: Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात, 14 मार्च रोजी रामलीला मैदानावर ट्रॅक्टर रॅली)
पहा व्हिडिओ-
Ranbir Singh Bhullar, AAP MLA from Ferozpur city calls farmers Bhenc**d.
Why aren't the saviours of Annadatas speaking out against this abusive AAPiya? pic.twitter.com/FIz2cSuwnj
— BALA (@erbmjha) February 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2024 10:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

