Murder Caught on Camera in Hyderabad: हैद्राबाद मध्ये भररस्त्यात पाठलाग करत तरुणाची निर्घृण हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद
ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Murder Caught on Camera in Hyderabad: तेलंगणातील हैद्राबाद येथे एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना बाळापूर येथील बाळापूरच्या रॉयल कॉलनीतील रस्त्यावर घडली आहे. हल्लेखोरांनी तरुणाचा पाठलाग केला. मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करताच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी तपासणी करत आहे. (हेही वाचा- मोठी बातमी! ऑनलाईन मागवलेल्या Yummo Ice Cream कोनमध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा; मालाडमधील घटना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)