MP Accident: ओव्हरटेकच्या नादात कारवर ट्रक उलटला, गुना राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चार जण जागीच ठार

मध्य प्रदेशातील गुना येथील राष्ट्रीय महामार्ग ४६वर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक अनियंत्रित झाल्याने कारवर आढळली.

MP Accident

MP Accident: मध्य प्रदेशातील गुना येथील राष्ट्रीय महामार्ग 46 वर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक अनियंत्रित झाल्याने कारवर आढळली. या भीषण अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले आणि दोन जण गंभीर जखमी झाले. रामप्रकाश, जय देवी, रोशनी आणि गीता अशी मृतांची नावे आहे. सुमित आणि राखी हे दोघे जण जखमी झाले असून त्यांना जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक मध्ये भंगार वस्तू घेऊन गुणाच्या मार्गाने जात होते. दरम्यान हा अपघात झाला. ट्रक ड्रायव्हरने ना हॉर्न वाजवला किंवा ब्रेक लावला नाही, थेट चुकीच्या बाजूने कट केला, ज्यामुळे कारला धडक दिली आणि ती पलटी झाली. या अपघातात कारचे संपुर्ण नुकसान झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now