India National Elections 2024 Google Doodle: भारत मधील 2024 च्या निवडणुका मतदानाचा आज पहिला टप्पा; गूगल कडून खास डूडल

भारत मधील 2024 च्या निवडणुका चा आज पहिला टप्पा सुरू झाला आहे. देशात पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान होत आहे.

Google doogle for Loksabha Election 2024

भारत मधील 2024 च्या निवडणुका: भारतात आजपासून लोकसभा निवडणूकीला (Lok Sabha Election 2024) सुरवात होत आहे. देशात पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान होत आहे. अश्यातच गुगलने होमपेजवर  भारत मधील 2024 च्या निवडणुका डूडलसह (Google Doodle) लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात सहभाग नोंदवला आहे. गुगल प्रत्येक सणासुदीच्या आणि महत्त्वाच्या दिवशी डूडल तयार करत असतं. आज देखील खास गुगल डूडल तयार केले आहे. निवडणूकीच्या निमित्ताने गुगलने O या अक्षरावर मतदानाच्या हाताची प्रतिमा आणि बोटावर शाईचे चिन्ह असलेले प्रतिमा बनवली आहे. याचा खास उद्देश असा की, नागरिकांना मतदानाबाबतील जागृक करणे या करिता गुगल कडून मतदानाच्या पहिल्या दिवशी खास डुडल. मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत सुरु राहणार आहे. (हेही वाचा Lok Sabha Elections 2024 Phase 1 Voting: महाराष्ट्रात 19 एप्रिल ला 5 जागांवर मतदान; पहा कसा, कधी, कुठे बजावाल तुमचा मतदानाचा हक्क! )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now