Sketch Artist Pay Homage to PM Modi's Mother: उत्तर प्रदेशातील चित्रकाराने कोळशाने भिंतीवर पंतप्रधान मोदी आणि त्यांची आई हीराबेन यांचे चित्र काढून वाहिली श्रद्धांजली

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील चित्रकार जुहैब खान यांनीही त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहताना भिंतीवर कोळशाने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचे चित्र बनवले आहे.

Prime Minister Narendra Modi and His mother Heeraben (PC - ANI/Twitter)

Sketch Artist Pay Homage to PM Modi's Mother: उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील स्केच आर्टिस्ट झुहैब खान ( Zuhaib Khan) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आई हीराबेन (Heeraben) यांचे चित्र रेखाटून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या पेन्सिल स्केचमध्ये पीएम मोदी आपल्या आईला हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. तसेच हीराबेन या नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्यावर शुक्रवारी सकाळी गांधीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हिराबेन यांची अहमदाबादच्या U.N. मेहता यांचे रुग्णालयात निधन झाले, जेथे त्यांना बुधवारी हृदयाशी संबंधित काही समस्यांमुळे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळापासून ते सर्वसामान्य नागरिकही रस्त्यावर उतरून शोक व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील चित्रकार जुहैब खान यांनीही त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहताना भिंतीवर कोळशाने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचे चित्र बनवले आहे. (हेही वाचा - Heeraben Modi Last Rites: हीराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी (Watch Video))

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now