Andhra Pradesh Fire Video: आंध्र प्रदेशातील तिरपती रेनिगुंटा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसला आग, कोणतीही जीवितहानी नाही
बस श्रीकालहस्तीकडे जात होती. आग लागताच, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Andhra Pradesh Fire Video: आंंध्र प्रदेशातील तिरुपती रेनिगुंटा राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली. बस श्रीकालहस्तीकडे जात होती. आग लागताच, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे अथक प्रयत्न केले. अधिकाऱ्यांनी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे धुरांचे लोट परिसरात पसरले आहे. आग कशी लागली हे अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा-चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा स्फोट; परिसर हादरला, घरांची पडझड(Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)