VIDEO: बेवारस बॅगेत सापडला महिलेचा शिरच्छेद मृतदेह, पाटण्याहून मुंबईला जात असलेल्या ट्रेनमधील घटना
रेल्वेच्या जनरल डब्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जनता एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गुरुवारी पाटण्याहून मुंबईला जात असताना ही घटना घडली. रेल्वेच्या जनरल डब्यात लाल रंगाची ट्रॉली बॅग प्रवाशांची बेवारस पडलेली दिसली.
VIDEO: रेल्वेच्या जनरल डब्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जनता एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गुरुवारी पाटण्याहून मुंबईला जात असताना ही घटना घडली. रेल्वेच्या जनरल डब्यात लाल रंगाची ट्रॉली बॅग प्रवाशांची बेवारस पडलेली दिसली. या बॅगतून रक्त टपकत होते. या घटनेची प्रवाशांनी आरपीएफला दिली. आरपीएफने घटनास्थळी पोहोचून ट्रॉली बॅग उघडली तेव्हा त्याच्यात २५ वर्षी महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला. मृताच्या अंगावर फक्त ब्लाउज आणि पेटीकोत घातलेला होता. आरपीएफने महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि यूपीच्या मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार स्टेशनवर ट्रॉलीसह टाकला. आरपीएफ प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सध्या मृताची ओळख पटलेली नाही. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली होती. (हेही वाचा- धबधब्याला पूर आल्याने 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तामिळनाडू येथील घटना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)