Uttar Pradesh: कोठडीत असलेल्या दलित व्यक्तीला दोन पोलिसांकडून बेदम मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर दोन्ही पोलिसांना कामावरून निलंबित करण्यात आले आहे.
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील रामपूर गावात एका दलित व्यक्तीला दोन पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर दोन्ही पोलिसांना कामावरून निलंबित करण्यात आले आहे. पीडित व्यक्तीच्या पत्नीने पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी दलित व्यक्तीला ताब्यात घेतले त्याला कोठडीत काठीने बेदम मारहाण केली आणि जातीवरून शिवीगाळ केले. या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत. पोलिस हवालदार जयदेव सिंग आणि अमित कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. पोलिस अधिकारी विद्या सागर मिश्रा यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी २२ जुलै रोजी घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ माजली आहे. (हेही वाचा- 'पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध हा बलात्कार नाही'; उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)