Kolkatta Car Collides With Express Train: रेल्वेरूळ क्रॉस करताना भरधाव ट्रेनची कारला धडक, थोडक्यात वाचला जीव, घटना CCTV कैद
पश्चिम बंगालमधील खर्डाहा स्थानकाजवळ रविवारी एक अपघात घडला. रस्ता क्रॉस करत असताना क्रॉसिंग गेटमधून कार गेली. तेवढ्यात वेगवान एक्स्प्रेस ट्रेन आली आणि कारला धडकली.
Kolkatta Car Collides With Express Train: पश्चिम बंगालमधील खर्डाहा स्थानकाजवळ रविवारी एक अपघात घडला. रस्ता क्रॉस करत असताना क्रॉसिंग गेटमधून कार गेली. तेवढ्यात वेगवान एक्स्प्रेस ट्रेन आली आणि कारला धडकली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हजारदुवारी एक्स्प्रेस समोरच्या दिशने जात होती. एक्स्प्रेस ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात एसयुव्ही कारला धडक लागली. कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. एसयूव्हीच्या ड्रायव्हरने लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करत असताना गेटमनच्या थांबण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. (हेही वाचा- रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली, अनेक गाड्या थांबल्या, प्रवासी चिंतेत (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)