Ghaziabad Road Rage: कारची पादचाऱ्याला धडक, दोन गटात तुफान हाणामारी, सहा जणांस अटक (Watch Video)

गाझियाबाद येथील मसूरी भागातील शमीम हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गा ९ वर दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरुध्द बाजूने येणाऱ्या एका कारने पादचाऱ्याला धडक दिली. त्यामुळे हा वाद सुरु झाला आणि वादांचे रुपांतर भांडणात झाले.

Video PC X

Ghaziabad Road Rage: गाझियाबाद येथील मसूरी भागातील शमीम हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गा 9 वर दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचा एक (Video) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरुध्द बाजूने येणाऱ्या एका कारने पादचाऱ्याला धडक दिली. त्यामुळे हा वाद सुरु झाला आणि वादांचे रुपांतर भांडणात झाले. दोन्ही गटांनी एकमेकांना लाथा बुक्क्याने मारहाण केली. या घटनेनंतर इतर पादचारी हैराण झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळी भांडणात सहभागी झालेल्या सहा आरोपींना अटक केले. या भांडणात आणखी एका काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- चालत्या बाईकवर पुशअप्स, तरुणाचा स्टंट पाहून नेटकरी संतापले (Watch Video)

 रस्त्यावर तुफान राडा 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement