Fight For Rasgulla In Marriage: लग्नसमारंभात रसगुल्ल्यांवरून भांडण, सहा जण जखमी, गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशात चक्क एका लग्न समारंभात रसगुल्ल्यावरून गदारोळ झाला. रसगुल्ला न मिळाल्याने सहा जणांमध्ये भांडण जुपलं.

6 injured in fight over shortage of rasgullas

Fight For Rasgulla In Marriage: उत्तर प्रदेशात चक्क एका लग्न समारंभात रसगुल्ल्यावरून गदारोळ झाला. रसगुल्ला न मिळाल्याने सहा जणांमध्ये भांडण जुपलं. या भांडणात सहा जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी मध्यरात्रीच्या शम्साबाद परिसरात ही घटना उघडकीस आली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे रुग्णालयात आहेत त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे शम्साबाद पोलिस स्टेशनचे एसएचओ अनिल शर्मा यांनी सांगितले. रविवारी आग्रा येथे ब्रिजभान कुशवाह यांचाय विवाह सोहळा होता. कार्यक्रमात एका व्यक्तीने रसगुल्ला न मिळाल्याने भांडणास सुरुवात केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement