Longest Hair On Male Teenager: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या 15 वर्षीय सिदकदीप सिंग चहल (Sidakdeep Singh Chahal) ने किशोरवयीन मुलाचे सर्वात लांब केस ठेवण्याचा अनोखा विश्वविक्रम केला आहे. आपल्या लांब केसांबद्दल बोलताना तो म्हणाला की, माझे केस इतके लांब येण्यासाठी मला खूप काळजी घ्यावी लागली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सिदकदीप सिंग चहलने आपल्या विश्वविक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, मी शीख धर्माचे पालन करतो आणि आम्हाला आमचे केस कापण्यास मनाई आहे. माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. माझी आई लहानपणापासून माझ्या केसांची खूप काळजी घेते.
#WATCH उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडा के 15 वर्षीय सिदकदीप सिंह चहल ने लीविंग मेल टीनएजर में सबसे लंबे बालों का गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाया।
सिदकदीप सिंह चहल ने कहा, "मैं सिख धर्म का पालन करता हूं और हमारे धर्म में बाल को वाहे गुरु जी की देन माना जाता है और इसे कभी कटवाया नहीं जाता।… pic.twitter.com/aWOEzZSon0
— ANI_HindiNews (@AHindinews) September 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)