Shahjahanpur Road Accident: शाहजहांपूर रस्ता अपघातात महिला आणि मुलांसह 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केला शोक
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
Shahjahanpur Road Accident: शाहजहांपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाची रेलिंग तुटून खाली पडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. सर्व भाविक गररा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते. ही घटना तिल्हार पोलीस ठाण्याच्या बिरसिंगपूर गावाजवळची आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, त्यानंतर प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. शाहजहांपूरमधील या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Khopoli Bus Accident: मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून दरीत कोसळलेल्या बस मधील जखमींची CM Eknath Shinde यांनी पनवेलच्या हॉस्पिटल मध्ये घेतली भेट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)