Tunisha Sharma Death Case: Sheezan Khan वर तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप; हत्येचा संशय व्यक्त करत Hijab सक्तीचा देखील पुनरूच्चार
तुनिषाच्या आईने शीझान खानकडून तुनिषाला हिजाब घालण्याबाबत सक्ती केली जात असल्याचं जाहीर पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.
तुनिषा शर्माच्या अवघ्या 20 व्या वर्षी झालेल्या निधनानंतर तिची आई खचली आहे. अभिनेत्री तुनिषाच्या कुटुंबीयांचे नुकतेच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यामध्ये 'लव्ह जिहाद' चा संशय व्यक्त केला जात असताना तिच्या आईने शीझान खानकडून तुनिषाला हिजाब घालण्याबाबत सक्ती केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.तसेच शिझानच्या मेकअपरूम मध्येच तिने आत्महत्या केल्याने तुनिषाला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण अॅम्ब्युलंस बोलावली नसल्याने हा हत्येचा प्रयत्न असू शकतो असाही संशय आईने व्यक्त केला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)