Bigg Boss मराठीच्या चौथ्या पर्वाची रिलीज डेट जाहीर, Mahesh Manjrekar नी प्रोमो शेअर करत दिली माहिती

बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा (Bigg Boss 4) आणखी एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेला हा प्रोमो अगदीच हटके पद्धतीचा आहे. या पर्वात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) अगदी हटके भूमिकेत दिसत आहे.

लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे 'बिग बॉस' (Bigg Boss). या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. 'बिग बॉस'चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा (Bigg Boss 4) आणखी एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेला हा प्रोमो अगदीच हटके पद्धतीचा आहे. या पर्वात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) अगदी हटके भूमिकेत दिसत आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे. आता या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण कलाकार असणार, पुन्हा तोच राडा होणार का? मैत्री आणि प्रेमाचे वारे वाहणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच बिग बॉस मराठीमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)