Bigg Boss Marathi 4 Finale: राखी सावंतने 9 लाखांची रक्कम स्वीकारून बिग बॉस मराठीच्या घरातून घेतला निरोप

यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

राखी सावंत (Photo Credits: Yogen Shah)

Rakhi Sawant Out: बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याची सुरुवात होण्यासाठी तसेच बिग बॉस मराठीच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा होण्यासाठी केवळ काही तास उरले आहेत. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज या खेळाचा 100 वा दिवस. अवघ्या काही तासात या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. दरम्यान या खेळातून राखी सावंत (Rakhi Sawant) बाहेर पडली आहे. राखी सावंतने 9 लाखांची रक्कम स्वीकारून ट्रॉफीच्या रेसमधून निरोप घेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now