‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता Ajinkya Raut च्या गाडीला झाला अपघात (Watch Video)

तसेच आजूबाजूला दरी असणारा रोड नव्हता, असेही त्याने सांगितले आहे.

Ajinkya Raut Accident (संग्रहित संपादित प्रतिमा)

‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतचा नुकताच अपघात झाला. अजिंक्यने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर अपघातानंतर त्याच्या कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्याने अपघाताबद्दल तपशीलवार माहिती देत सांगितले की, देवाच्या कृपेने आणि चाहत्यांच्या प्रेमामुळे तो या अपघातामधून बचावला. ठाण्यावरून परभणीला जाताना हा अपघात घडला आहे. त्यावेळी आपण गाडी चालवत नसल्याचेही अजिंक्याने सांगितले आहे. तसेच नशिबाने गाडीचा वेग नियंत्रणात होता, म्हणून खूप भयावह असे काही घडले नाही. तसेच आजूबाजूला दरी असणारा रोड नव्हता, असेही त्याने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)