Khupte Tithe Gupte Raj Thackeray Promo: 'खुपते तिथे गुप्ते'च्या नव्या सीझनची सुरूवात राज ठाकरेंसोबत; 'ठाकरे कुटुंबाचे' जुने फोटो पाहून भावूक झाले मनसे अध्यक्ष (Watch Video)
खुपते तिथे गुप्ते चा नवा सीझन 4 जून पासून सुरू होत आहे. यामध्ये पहिल्याच भागात राज ठाकरे दिसणार आहेत.
'खुपते तिथे गुप्ते' या टॉक शो ची अनेक वर्ष प्रतिक्षा होती. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे. 4 जून पासून पुन्हा नव्या अंदाजात आणि अधिक धारधार प्रश्नांसह अवधूत गुप्ते रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यंदाच्या सीझन मध्ये पहिलेच अतिथी राज ठाकरे आहेत. नव्या सीझन मध्ये पहिल्या प्रोमोत राज ठाकरे अजित पवारांवर टीका करताना दिसले आहेत तर आता दुसर्या प्रोमो मध्ये त्यांचा हळवा अंदाज बघायला मिळाला आहे. राज ठाकरेंसमोर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो आल्यानंतर त्यांनी ' हे दिवस खूप सुंदर होते. कोणाची तरी नजर लागली किंवा कोणी तरी विष कालावलं' अशी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)