Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022: सोनी मराठी वाहिनीच्या 'बोला जयभीम' कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिली जाणार सुरांची मानवंदना!
ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, सगळ्यांचा लाडका गायक उत्कर्ष शिंदे आणि तिसर्या पिढीतील अल्हाद आदर्श शिंदे असे तीन पढ्यांतील गायक आपल्या गायनाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारआहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'बोला जयभीम' (Bola Jay Bhim) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम 10 एप्रिलला रविवारी संध्याकाळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'बोला जयभीम' या कार्यक्रमात बाबासाहेबांवरची अनेक गाणी शिंदे घराण्यातले प्रसिद्ध गायक गाणार आहेत. 'बोला जयभीम' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शिंदे घराण्यातल्या तिन्ही पिढ्या एकाच मंचावर आपली कला सादर करणार आहेत. ज्येष्ठ गायक आनंद शिंदे,सगळ्यांचा लाडका गायक उत्कर्ष शिंदे आणि तिसर्या पिढीतील अल्हाद आदर्श शिंदे असे तीन पिढ्यांतील गायक आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. शिंदे घराण्याच्या गाण्यांबरोबरच दर्जेदार नृत्यांचे सादरीकरणदेखील होणार आहे. बाबासाहेब आणि त्यांचे कार्य यांचा महिमा आजच्या तरुण पिढीपर्यंत 'बोला जयभीम' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)