Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात अभिजित सावंत 2 महिन्यांनी भेटला पत्नी अन लेकींना; मुलीने केली बिग बॉस कडे गोड मागणी (Watch Video)
सध्या तो विजेता होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. 6 ऑक्टोबरला होणार्या अंतिम सोहळ्यात त्याचं मक्
चा खेळ आता शेवटाकडे आला आहे. 100 ऐवजी 70 दिवसांतच हा खेळ संपणार असल्याने घरातील सदस्यांच्या भेटीला त्यांचे कुटूंबिय येणार आहेत. दोन महिन्यांच्या बिग बॉसच्या घरातील खेळानंतर अभिजित सावंत हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. घरात त्याच्या संयमी स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. घरात 2 महिन्यांनी त्याची पत्नी आणि दोन्ही मुली आल्यानंतर तो भावूक झालेला पहायला मिळाला. दरम्यान अभिजितच्या लेकीने यावेळी बिग बॉस कडे आपल्याला घरात रहायला मिळेल का? असा प्रश्न विचारला त्यावर बिग बॉसनेही 'घराला एक वाईल्ड कार्ड स्पर्धक मिळाला' अशी प्रतिक्रिया दिल्याचं प्रोमोत पहायला मिळालं आहे.
अभिजीत सावंतच्या भेटीला लेकी पोहचल्या घरात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)