Bigg Boss Marathi 4 Contestants List: बिग बॉस मराठी 4 मध्ये एकूण 16 स्पर्धकांची एन्ट्री, जाणून घ्या संपूर्ण यादी

बिग बॉस मराठी 4 हा शो तुम्ही कलर्स मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता, तर वीकेंडला शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता पाहू शकता.

Bigg Boss Marathi 4 (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या मराठी बिग बॉसच्या 4 थ्या पर्वाला अखेर सुरुवात झाली आहे. आज बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धकांनी प्रवेश केला. आता पुढच्या 100 दिवसांसाठी हे स्पर्धक एकत्र असणार आहेत. बिग बॉस मराठी 4 हा शो तुम्ही कलर्स मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10  वाजता, तर वीकेंडला शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता पाहू शकता.

आज घरात, तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखील राजशिर्के, अमृता धोंगडे, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशश्री मसुरकर, विकास सावंत, अपूर्वा नेमळेकर, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव या लोकांनी एन्ट्री घेतली आहे. यातील त्रिशूल मराठे हा नाशिकचा स्पर्धक एक कॉमनर असून, तो सर्वसामान्यातून निवडून गेलेल्या स्पर्धकातील एक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement