Bigg Boss Marathi 3, October 1 Episode Preview: कॅप्टन्सी पदासाठी गायत्री दातार कडून विकास पाटील ची 'ही' अट मान्य
बिग बॉस मराठी 3 मध्ये आज घराच्या दुसर्या कॅप्टनपदाच्या शर्यतीमध्ये गायत्री दातार आणि जय दुधाणे शर्यतीमध्ये आहेत.
हल्लाबोल हे साप्ताहिक कार्य जिंकून गायत्री दातार आणि जय दुधाणे हे दोघे स्पर्धक बिग बॉस घराच्या दुसर्या कॅप्टनपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. यावेळी घरातील सदस्यांकडे पाठबळ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशात गायत्रीने मागील हेवेद्दावे विसरून विकासकडे मदत मागितली असता त्याने कॅप्टन म्हणून मला घरात टिकवून ठेवण्यासाठी तुला संधी असेल तर त्याचा मला फायदा मिळाला पाहिजे अशी अट घातली आणि गायत्रीनेही ती कबूल केल्याचं प्रिव्ह्यू मध्ये पहायला मिळत आहे.
आजच्या भागाचा प्रिव्ह्यू
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)