KK Goswami Car Caught Fire: टीव्ही प्रसिद्ध अभिनेते केके गोस्वामीच्या चालत्या कारला आग, मोठा अपघात टळला

शे. कोई है, शक्तिमान, विक्राल आणि गब्राल यांसारख्या शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या कारला अचानक आग लागली. त्यावेळी ते मुलासह कारमध्ये उपस्थित होते.

टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेते केके गोस्वामी (KK Goswami) या मोठ्या घटनेतून थोडक्यात बचावले. श... कोई है, शक्तिमान, विक्राल आणि गब्राल यांसारख्या शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या कारला अचानक आग लागली. त्यावेळी ते मुलासह कारमध्ये उपस्थित होते. ही घटना सिटी सेंटरच्या एसव्ही रोडची आहे. कारला आग लागली तेव्हा गोस्वामी आपल्या 21 वर्षीय मुलगा नवदीपसोबत कारमध्ये होते. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता. त्यावेळी दोघे कॉलेजच्या दिशेने जात होते. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब आजही शॉकमध्ये आहे. कारला अचानक आग कशी लागली याबाबत अद्याप कोणालाच माहिती नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)