The Pride of Bharat – Chhatrapati Shivaji Maharaj या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील बायोपिकचे पहिले पोस्टर आले समोर, पाहा फोटो
16 फेब्रुवारी रोजी संदीपने त्याच्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण केले, पाहा फोटो
The Pride of Bharat – Chhatrapati Shivaji Maharaj: लेखक-निर्माता संदीप सिंग हे त्यांच्या द प्राइड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. 16 फेब्रुवारी रोजी संदीपने त्याच्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण केले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पोस्टरचे अनावरण केले. संदीपने चित्रपटाचे पोस्टर आणि मंत्र्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हा चित्रपट १७व्या शतकातील मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील असुन हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा बायोपिक असणार आहे. इमर्सो स्टुडिओ आणि लीजेंड स्टुडिओज निर्मित हा बायोपिक 23 जानेवारी 2026 रोजी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्टर:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)