Vaishali Made: गायिका वैशाली माडेच्या जीवाला धोका, फेसबुक पोस्ट शेअर करत दिली माहिती
अचानक असं काय झालं की वैशालीच्या जीवाला धोका आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. स्वतः वैशालीने दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मराठी सारेगमप विजेती आणि बिग बॉस मराठीच्या 2 -या सीझनची स्पर्धक सुप्रसिध्द गायिका वैशाली माडे हिला जीवाला धोका असल्याची पोस्ट तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. वैशाली माडेच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण अचानक असं काय झालं की वैशालीच्या जीवाला धोका आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. स्वतः वैशालीने दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पाहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)