Munjya Box Office Collection Day 16: शर्वरी वाघ, अभय वर्मा यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट मुंज्याची 100 कोटींकडे घोडदौड; भारतात गाठला 'इतक्या' कोटींचा टप्पा

आतापर्यंत ‘मुंज्या’ चित्रपटाने 16 दिवसांत एकूण 80.11 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आता लवकरच हा हॉरर कॉमेडी चित्रपट 100 कोटींचाही आकडा ओलांडणार अशी चर्चा आहे.

Photo Credit -X

Munjya Box Office Collection Day 16:  सध्या बॉक्स ऑफिसवर आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. 7 जूनला प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ चित्रपटाला (Munjya Movie) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकजण चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांचं कौतुक करत आहे. कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ असो किंवा राजकुमार राव व जान्हवी कपूरचा ‘मिस्टर अँड मिसेज माही’ असो या सगळ्या चित्रपटांना ‘मुंज्या’ जोरदार टक्कर देत आहे. चित्रपटाची 100 कोटींच्या दिशेने जोरदार घोडदौड सुरू आहे. भारतात चित्रपटाने 80 कोटींचा गल्ला पार केला आहे. (हेही वाचा: Munjya Movie Trailer: अंगाला काटा आणणारा 'मुंज्या' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट होईल रिलीज)

पोस्ट पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)