Rajeshwari Kharat: फॅड्री चित्रपटातील शालूची आता बॉलिवूडमध्ये एंट्री! 'पुणे टू गोवा' या बॉलिवूड चित्रपटात राजेश्वरी झळकणार
लवकरच 'पुणे टू गोवा' या बॉलिवूड चित्रपटात राजेश्वरी झळकणार आहे. अमोल भगत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिगदर्शित फॅड्री (Fandry) चित्रपटातील शालु तुम्हाला माहितच असेलच. शालु म्हणचे राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. पण ती आता चर्चेत आहे कारण ती बाॅलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे तिच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. लवकरच 'पुणे टू गोवा' या बॉलिवूड चित्रपटात राजेश्वरी झळकणार आहे. अमोल भगत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)