Sana Khan Blessed With Baby Boy: बॉलिवूडला अलविदा करणारी अभिनेत्री सना खानने दिला मुलाला जन्म, पोस्ट शेअर करून दिली माहिती
ही माहिती सोशल मीडियावर शेअर करत सनाने देवाचे आभार मानले आहेत, पाहा पोस्ट
Sana Khan Blessed With Baby Boy: बॉलिवूडला अलविदा करणारी अभिनेत्री सना खान आज पहिल्या अपत्याची आई झाली असून, तिने एका मुलाला जन्म दिला आहे. ही माहिती सोशल मीडियावर शेअर करत सनाने देवाचे आभार मानले आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, अल्लाह आम्हाला आमच्या मुलासाठी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवो. अल्लाहचा भरवसा सर्वोत्तम असणे आवश्यक आहे. जझाकअल्लाह खैर, तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी ज्याने आमच्या या सुंदर प्रवासात साथ दिली आहे. सना खानच्या या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून ते माजी अभिनेत्रीचे अभिनंदन करत आहेत.
पाहा पोस्ट,
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)