राखी सावंतच्या आईचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. राखीची आई जया सावंत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. राखीला अनेकवेळा हॉस्पिटलबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. राखी अनेकदा मीडियासमोर तिच्या आईच्या तब्येतीचे अपडेट्स देताना दिसली. तसेच ती चाहत्यांना सतत आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करत असे. जया यांच्या निधनामुळे राखी आणि तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)