'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमचे वृक्षारोपण
दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक सचिन मोटे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, निखिल बने, दत्तात्रेय मोरे, श्यामसुंदर राजपूत, अरुण कदम या कलाकारांनी यंदा हरित दिवाळी साजरी केली.
दिवाळीचं औचित्य साधून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या कलाकारांनी नॅशनल पार्क, बोरिवली येथे वृक्षारोपण केले. प्रेक्षकांना हसविण्यात माहीर असलेले हे कलाकार पर्यावरणाबाबतही जागरूक आहेत. दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक सचिन मोटे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, निखिल बने, दत्तात्रेय मोरे, श्यामसुंदर राजपूत, अरुण कदम या कलाकारांनी यंदा हरित दिवाळी साजरी केली.
सह्याद्री देवराई' या सामाजिक संस्थेच्या मदतीने हे वृक्षारोपण केले. या संस्थेचे खजीनदार सचिन चांदणे आणि चैतन्य गाडगीळ, सचिन ठाकुर, निशांत भारद्वाज, समाधान लबदे, शंतनु हेर्लेकर आणि सिद्धार्थ पडियार हे सभासद उपस्थित होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)