पियुष रानडे (Piyush Ranade) तिसर्‍यांदा विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेत्री सुरूची  अडारकर (Suruchi Adarkar) सोबत त्याने विधिपूर्वक लग्न केले आहे. त्यांनी लग्नानंतर सोशल मीडीयात फोटोज शेअर केले आहेत. सध्या पियूष 'काव्यांजली सखी सावली' मालिकेत मुख्य भूमिकेमध्ये आहे. शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्यानंतर आता पुन्हा पियुष नव्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात अभिनेत्री सुरूची अडारकर सोबत करत आहे. त्यांच्या लग्नाच्या बातमीने अनेकांना सुखद धक्का बसला आहे. दरम्यान सिनेक्षेत्रातूनही अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. Pooja Sawant fiancé: पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? अभिनेत्री ने अखेर जाहीर केली ओळख .

पहा लग्नाचे फोटोज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)