Mohammed Rafi Death Anniversary: रफी साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीवर पोहोचले चाहते, 'भारतरत्न' देण्याची केली मागणी
आज 42 वर्षे उलटली तरी त्यांची गाणी आजही जिवंत आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक असलेले मोहम्मद रफी हे गायनविश्वातील एक नाव आहे, ज्यांनी भारतीय चित्रपट आणि भारतीय संगीताला अशा स्थानावर नेले, ज्यांचे भारतीय चित्रपट सदैव ऋणी राहील. आज 31 जुलै रोजी मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी (Mohammed Rafi Death Anniversary) आहे. आज 42 वर्षे उलटली तरी त्यांची गाणी आजही जिवंत आहेत. विविध प्रसंगी लोक त्यांची गाणी गातात, त्यांची आठवण काढतात. दरम्यान रफी साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे चाहते समाधीवर पोहोचले आणि त्यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)