Olivia Rodrigo Bra Top Almost Falls: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ब्रा टॉपचे हूक निघाले अन्...; अमेरिकन पॉप स्टार ऑलिव्हिया रॉड्रिगोचा 'तो' व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

लंडन येथे कॉन्सर्ट दरम्यान तिच्या टॉपचे हूक अचानक निघाले. मात्र, तो सावरत निराश न होता, गायिकेने तिचे गाणे सुरू ठेवेल होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Photo Credit - X

Olivia Rodrigo's Bra Top Almost Falls: पॉप स्टार ऑलिव्हिया रॉड्रिगो (Olivia Rodrigo) हिच्या सोबत लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॉन्सर्टमध्ये मोठी दुर्घटना घडली. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये लाखो चाहत्यांसमोर गाणे गात असताना तिने घातलेल्या ब्रा टॉप(Bra Top)चे हूक अचानक निघाले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात तिचा टॉप पूर्ण निघण्याच्या परिस्थीतीत असताना तिच्या सोबत असलेली एक बॅकस्टेज डान्सर तिच्या मदतीला धावते. मात्र, तिचा प्रयत्न अपयशी ठरतो. तिला  ऑलिव्हिया हिचा ड्रेस फिक्स करता येत नाही. त्यानंतर ऑलिव्हिया रॉड्रिगो स्व:त परिस्थीती हाताळते आणि गाणे चालू ठेवते. (हेही वाचा:Esha Gupta Opens Up About Freezing Her Eggs: ईशा गुप्ताने व्यक्त केले आई होण्याचे स्वप्न, लवकरच होऊ शकते लग्न! )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)