Close
Advertisement
 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Esha Gupta Opens Up About Freezing Her Eggs: ईशा गुप्ताने व्यक्त केले आई होण्याचे स्वप्न, लवकरच होऊ शकते लग्न!

'राझ 3', 'जन्नत 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता आता चित्रपट जगतापासून दूर आहे. 2019 मध्ये ती शेवटची पडद्यावर दिसून आली होती. अलीकडेच एका वेबसाईटला दिलेल्या विशेष मुलाखतीत ईशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि स्पेनमधील तिच्या नवीन व्यवसायाविषयी खुलेपणाने सांगितले आहे.

मनोरंजन Shreya Varke | May 14, 2024 12:02 PM IST
A+
A-
Esha Gupta

Esha Gupta Opens Up About Freezing Her Eggs: 'राझ 3', 'जन्नत 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता आता चित्रपट जगतापासून दूर आहे. 2019 मध्ये ती शेवटची पडद्यावर दिसून आली होती. अलीकडेच एका वेबसाईटला दिलेल्या विशेष मुलाखतीत ईशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि स्पेनमधील तिच्या नवीन व्यवसायाविषयी खुलेपणाने सांगितले आहे. ईशाने सांगितले की तिने स्पेनमध्ये एक रेस्टॉरंट उघडले आहे आणि तिचा प्रियकर मॅन्युएल कॅम्पस गुलारने तिला खूप पाठिंबा दिला आहे. मॅन्युअल हा स्पॅनिश व्यावसायिक असून त्याने ईशाला या नव्या सुरुवातीस मदत केली आहे.

ईशाने असेही सांगितले की ते दोघेही लवकरच लग्न करू शकतात आणि त्यांना मुले होण्याचीही योजना आहे. तिने सांगितले की तिने आधीच तिची Eggs Freez केले आहेत आणि IVF किंवा सरोगसीद्वारे मातृत्वाची योजना आखत आहे.

ईशा म्हणते की, तिला तिच्या आयुष्यात कोणताही ताण नाही आणि ती तिच्या सध्याच्या जीवनात पूर्णपणे समाधानी आहे. मॅन्युएलसोबतच्या तिच्या नव्या आयुष्यात ती खूश आहे आणि तिने फिल्मी दुनियेपासून दूर राहून नवी सुरुवात केली आहे.


Show Full Article Share Now