Ved Film: 'वेड' चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; अभिनेत्री Genelia D'Souza ने मानले प्रेक्षकांचे आभार (Watch)
रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा या पती-पत्नी जोडीने 'वेड' चित्रपटातून सर्वांची मने जिंकली आहेत. दुसरीकडे ‘वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून सर्वांनाच चकित केले आहे.
नुकतेच हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकार रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'वेड' प्रदर्शित झाला आहे. रितेश आणि जेनेलियाने या चित्रपटाचे भरपूर प्रमोशन केले होते. सध्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुखने या चित्रपटात उत्तम काम केले आहे. रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा या पती-पत्नी जोडीने 'वेड' चित्रपटातून सर्वांची मने जिंकली आहेत. दुसरीकडे ‘वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून सर्वांनाच चकित केले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 10 कोटींची कमाई केली आहे.
आता चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून जेनेलिया भारावून गेली आहे. तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तिने सोशल मिडियावर लिहिले- 'रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)