Sari Trailer: 'सरी' चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण, ट्रेलर प्रदर्शित तर 'या' दिवशी होणार रिलीज

कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित हा चित्रपट येत्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहुन यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार याची कल्पना आतापर्यंत आली असेलच.

'सरी' चित्रपटाचा ट्रेलर (Sari Trailer) नुकताच प्रदर्शित झाला आहे. अशोका के. एस. दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित हा चित्रपट येत्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहुन यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार याची कल्पना आतापर्यंत आली असेलच. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, चित्रपटाच्या प्रदर्शनाची.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement