Yek Number Teaser Out: 'येक नंबर' चित्रपटाचा भन्नाट टिझर नुकताच प्रदर्शित, 'त्या' आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

'येक नंबर' या चित्रपटाचा भन्नाट टिझर (Yek Number Teaser) नुकताच प्रदर्शित झाला असून हा टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात आता असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या 10 ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळणार आहेत.

Photo Credit - Youtube

Yek Number Teaser Released: झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भन्नाट टिझर (Yek Number Teaser) नुकताच प्रदर्शित झाला असून हा टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात आता असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या 10 ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळणार आहेत. पोस्टर झळकल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात लक्षवेधी ठरली, ती पोस्टरमधील करारी नजर आणि त्यात भर टाकली आहे ती पोस्टरमधील बुलंद आवाजाने. त्यामुळे हा बायोपिक आहे का, हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच प्रचंड उत्सुकता लागली आहे. दरम्यान टिझरमध्ये धैर्य घोलपसह सायली पाटीलची झलकही दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटाच्या तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला निर्मात्या आहेत. 'येक नंबर'ला अजय-अतुल यांसारखे कमाल संगीतकार लाभले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement