Susheela Sujeet Marathi Film: दिग्गज चित्रपट स्टुडिओ Panorama ने प्राप्त केले मराठी चित्रपट 'सुशीला सुजीत'चे जगभर वितरण आणि संगीत हक्क; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित
पॅनोरमा स्टुडिओ ही कुमार मंगत पाठक यांनी स्थापन केलेली एक मोठी आणि लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे.
Susheela Sujeet Marathi Film: मराठी चित्रपट सृष्टीमधील दोन उत्कृष्ट कलाकार- स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र येत आहे. या दोघांचा ‘सुशीला-सुजित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. सध्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाची मोठी चर्चा आहे. या सिनेमाची निर्मिती स्वप्नील जोशी, मंजिरी व प्रसाद, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे आणि निलेश राठी करत आहे. आता हा चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. दिग्गज चित्रपट स्टुडिओ पॅनोरमाने 'सुशीला सुजीत'चे जगभर वितरण आणि संगीत हक्क प्राप्त केले आहेत. पॅनोरमा स्टुडिओ ही कुमार मंगत पाठक यांनी स्थापन केलेली एक मोठी आणि लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे.
सिनेमाची कथा प्रसादची असून सिनेमाचे संवाद आणि पटकथा अजय कांबळे याने लिहिले आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन स्वतः प्रसाद ओक करणार आहे. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा: Elli AvrRam चं 'Ilu Ilu 1998' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; आज सिनेमाचा टीझरही रीलीज)
मराठी चित्रपट 'सुशीला सुजीत-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)