Har Har Mahadev: ठंरल तर! 'हर हर महादेव' या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

नुकतंच या चित्रपटाचं डिजीटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असुन सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Har Har Mahadev: ठंरल तर! 'हर हर महादेव' या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता
Har Har Mahadev (Photo Credit - Instagram)

अभिजित देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' या भव्य दिव्य चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील आणि मुख्य म्हणजे यात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. नुकतंच या चित्रपटाचं डिजीटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असुन सुबोध भावे (Subodha Bhave) या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. देशभरातील लोकांसाठी आजही शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2022 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).