Soyarik Marathi Movie: मकरंद माने दिग्दर्शित 'सोयरीक' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
नितीश चव्हाण 'सोयरीक' चित्रपटातुन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १४ जानेवारीला प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.
लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘अज्या’ अर्थात अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Cavan) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे ते म्हणजे सोयरीक. नितीश चव्हाण 'सोयरीक' चित्रपटातुन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १४ जानेवारीला प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. या मोशन पोस्टरमध्ये लग्नाचा माहोल दिसत असून, नितीश चव्हाणचा चेहरा दिसतोय. पाठमोरी उभी असलेली मुलगी कोण? हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)