Sai Tamhankar Alech Mi Lavani: सई ताम्हणकर पहिल्यांदाच सादर करणार लावणी; 'देवमाणूस' मधील 'आलेच मी...' ची झलक आली समोर (Watch Video)
आशिष पाटील ने कोरिओग्राफ केलेल्या 'आलेच मी...' लावणी वर सई ताम्हणकर 'देवमाणूस' सिनेमात दिसणार आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या विविधांगी भूमिकांमुळे कायमच चर्चेमध्ये राहिली आहे पण पहिल्यांदाच सई सिनेमात लावणी करताना दिसणार आहे. आगामी'देवमाणूस' सिनेमामध्ये 'आलेच मी...' गाण्यावर तिच्या अदांची पहिली झलक समोर आली आहे. बेला शेंडेच्या आवाजातील 'आलेच मी..' लावणी रोहन- रोहन यांची आहे. आशिष पाटील ची कोरिओग्राफी आहे. दरम्यान देवमाणूस हा सिनेमा 25 एप्रिलला रीलीज होणार असून या सिनेमामध्ये महेश मांजरेकर, रेणूका शहाणे मुख्य भूमिकेत आहेत. Devmanus Trailer: रेणूका शहाणे- महेश मांजरेकर जोडीचा 'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर रीलीज (Watch Video).
'आलेच मी...' लावणी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)