'बाईपण भारी देवा...' पाहून सचिन तेंडुलकरचा दीपा परबला आला व्हिडिओ कॉल; अभिनेत्रीने शेअर केला 'DREAM COME TRUE MOMENT'
सहा बहिणींच्या कहाणीमध्ये दीपा परबने 'चारू' ही शेंडेफळ असलेल्या बहिणीची भूमिका बजावली आहे.
सैराटचे विक्रम मोडीत काढत बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार्या 'बाईपण भारी देवा...' चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. नुकतच या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग सचिन तेंडुलकर साठी ठेवण्यात आलं होतं. अजित भुरे, राज ठाकरे, दिग्दर्शक केदार शिंदे याला हजर होते. अशावेळी चित्रपटातील कलाकारांची देखील उपस्थिती होती पण ' तू चाल पुढं' च्या शूटिंग मध्ये व्यस्त असलेल्या दीपा परबला मात्र या स्क्रिनिंगला उपस्थित राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे उपस्थितांपैकी एकाने दीपाला चक्क व्हिडिओ कॉल लावून देत सचिनशी संवाद घडवून दिला. दीपाने या व्हिडिओ कॉलची झलक इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. सोबतच एक खास पोस्ट लिहून हा आपल्या आयुष्यातील 'ड्र्रिम कम ट्रू' अनुभव असल्याची भावना व्यक्त केली आहे. Baipan Bhaari Deva Box Office Collection: 'बाईपण भारी देवा'चे रेकॉर्डब्रेक कलेक्शन; तीन आठवड्यात 50 कोटींची कमाई.
पहा दीपा परब ची पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)