अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ने केली 'Dream Collaboration' ची घोषणा; पहिल्यांदाच पती अभिषेक जावकर च्या दिग्दर्शनाखाली करणार अभिनेत्री म्हणून काम
प्रार्थनाने इंस्टाग्राम वर या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. हा सिनेमा आपल्यासाठी 'Dream Collaboration' असल्याचं तिने म्हटलं आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेअभिषेक पहिल्यांदाच पती अभिषेक सोबत सिनेमामध्ये काम करणार आहे. आज या त्यांच्या नव्या सिनेमाच्या घोषणा झाली असून सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला आहे. प्रार्थनाने इंस्टाग्राम वर या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. हा सिनेमा आपल्यासाठी 'Dream Collaboration' असल्याचं तिने म्हटलं आहे. नव्या सिनेमामध्ये अभिषेक जावकर दिग्दर्शकाच्या भूमिकेत असणार आहे तर प्रार्थना अभिनेत्री असणार आहे. 'चिकी चिकी बुमम बुम' मध्ये प्रार्थना नुकतीच झळकली होती. छोट्या पडद्यावर श्रेयस तळपदे सोबत प्रार्थना 'तुझी माझी रेशीमगाठ' मालिकेत विशेष गाजली.
प्रार्थना बेहेरे कडून नव्या सिनेमाची घोषणा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)